IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गोलंदाज लुकमान मेरिवाला याला दिल्लीच्या संघानं 20 लाख रुपयांना खरेदी केलं. हा 29 वर्षीय खेळाडू सध्या सर्वांचं लक्ष वेधत असला, तरीही त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय होता. कारण, त्याला कारकिर्दीत संधीच मिळाली नव्हती. अखेर लुकमाननं खेळातूनच काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. पण, नंतर आई- वडिलांच्या सांगण्यावरून त्यानं पुन्हा एकदा या खेळात नव्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र मागं वळुन पाहिलं नाही. 


वडोदरा या संघातून खेळणाऱ्या लुकमान मेरिवाला यानं वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला होता. याचबाबत सांगताना तो म्हणालेला, 'माझे आईबाबा शेकतरी होते. पाचजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होऊन बसला होता. यामुळं मी क्रिकेटमधून काढता पाय घेतला. मी फॅब्रिकेशनचं काम सुरु केलं आणि यातून कुटुंबाला मदत करु लागलो,', असं तो म्हणाला. आईवडील आणि काकांच्या मदतीनं त्यांच्या सांगण्यारुन त्यानं खेळात पुन्हा नवी सुरुवात केली. 


DC vs PBKS, Innings Highlights : दिल्लीचं 'शिखर' पार, पंजाबवर सहा विकेट्सने मात करत गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर झेप


कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन त्यानं पुन्हा एक सुरुवात केली, ज्यानंतर अंडर 19 क्रिकेट संघात त्याला स्थान मिळालं. यानंतर एकदिवसीय क्रिकेट संघातही त्याला जागा मिळाली. 2013-14 मध्ये मेरिवाला टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. 2017 मध्ये त्यानं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सध्या तो आयपीएलमध्ये खेळत असून, इशांत शर्मा आणि उमेश यादव या खेळाडूंशी खूप काही शिकू इच्छितो. लुकमानच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत टी20 करिअरबाबत चर्चा करायची झाल्यास, त्यानं 44 सामन्यांमघ्ये 15 च्या सरासरीनं 72 विकेट घेतले. इकोनॉमी 7 हून कमी असून त्याचा स्ट्राईक रेट 13 इतका आहे.