IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. केकेआरचा स्टार स्पिनर सुनील नारायणला संशयास्पद गोलंदाजी प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. गेल्या आठवड्यात सुनील नारायण विरोधात गोलंदाजी करताना संशयास्पद ॲक्शन संदर्भात तक्रार केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या गोलंदाजी ॲक्शन कमिटीने सुनील नाराणयला क्लीन चिट दिली आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर सुनील नारायण पुन्हा केकेआरकडून खेळू शकतो.


IPL 2020 : दिल्ली गुणतालिकेत पुन्हा नंबर वन, ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?


गेल्या आठवड्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सुनील नाराणय विरुद्ध संशयास्पद गोलंदाजी ॲक्शन केल्याची तक्रार करण्यात आली होती. जर सुनीलला क्लीन चिट मिळाली नसती आणि त्याच्याविरूद्ध आणखी एक तक्रार आली असती तर त्याला या स्पर्धेत खेळण्यास बंदीची कारवाई झाली असती.


सुनील नारायणची बॉलिंग ॲक्शन कायम वादात


सुनील नारायण गोलंदाजी करताना त्याच्या ॲक्शनमुळे नेहमीच वादात असतो. सुनीलच्या गोलंदाजी ॲक्शनबद्दल 2014 मध्ये पहिली तक्रार करण्यात आली होती. 2014 च्या चॅम्पियन्स लीग दरम्यान नारायणच्या गोलंदाजी कृतीची दोनदा तक्रार केली गेली होती. परिणामी त्याला 2015 मधील एकदिवसीय विश्वचषकाला मुकावे लागले होते.


साल 2015 मधील आयपीएलदरम्यान सुनीलची गोलंदाजी ॲक्शन वादात आली होती आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या गोलंदाजीवर बंदी घातली होती. आयसीसीने एप्रिल 2016 मध्ये नाराणयणला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली होती. परंतु, त्यावर्षी त्याने ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात भाग घेतला नाही. मार्च 2018 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत असताना सुनीलच्या गोलंदाजी ॲक्शनबद्दल तक्रारी आल्या.


कार्तिकनं ऑईन मॉर्गनकडे सोपवलं कर्णधारपद,दिनेश कार्तिकनं कोलकात्याचं नेतृत्व सोडली की त्याला काढलं?