IPL 2020 SRH vs CSK : आयपीएलमध्ये आजपासून परतीच्या सामन्यांना सुरुवात होते आहे. या परतीच्या सामन्यातला पहिला मुकाबला आज सनरायझर्स हैदराबाद आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये होणार आहे. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईचा सात विकेट्सनी पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज धोनीचा संघ मैदानात उतरेल.


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. या हंगामात सीएसकेने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर त्याला पाच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा अपयशी कर्णधार आहे.


डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ थोड्या चांगल्या स्थितीत आहे. परंतु हैदराबादची कामगिरी देखील इतर संघांपेक्षा फारशी चांगली राहिली नाही. सनरायझर्स हैदराबादने या हंगामात 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 3 जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. एसआरएचची टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.


SRH आणि CSK या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये 13 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 वेळा विजय मिळवला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने केवळ चार सामने जिंकले आहेत.


सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना कधी आहे?
सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk) आयपीएल 2020 सामना मंगळवार, 13 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 कोठे खेळला जाईल?
सनरायझर्स हैदराबाद (SRH)वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना कधी सुरू होणार आहे?
सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस सायंकाळी 7 वाजता होणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामन्याचे थेट प्रसारण कोठे पाहू शकतो?
सनरायझर्स हैदराबाद (SRH) वि चेन्नई सुपर किंग्ज (CSk)आयपीएल 2020 सामना सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवर देखील पाहता येणार आहे.


सनरायजर्स हैदराबाद: डेविड वार्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बैसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रीयम गर्ग, जेसन होल्डर, संदीप बवांका, फाबियान ऐलेन, अब्दुल समद, संजय यादव


सनराइजर्स हैदराबाद संभाव्य संघ
डेविड वार्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, राशिद खान, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा , खलील अहमद, आणि टी नटराजन


चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, शेन वाटसन, शार्दूल ठाकुर, अंबाती रायडू, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, दीपक चाहर, लुंगी एनगिडी, मिशेल सैंटनर, केएम. आसिफ, नारायण जगदीशन, मोनू कुमार, रितुराज गायकवाड़, आर. साई किशोर, जोश हेजलवुड, सैम कुरैन


चेन्नई सुपर किंग्स संभाव्य संघ
महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, सैम कुरेन, एन जगदीशन आणि कर्ण शर्मा.