ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिलीची भारताविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या फायनलमधली इनिंग तुम्हाला नक्कीच आठवत असेल. याच एलिसा हिलीनं आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. एलिसा हिलीनं पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात हिलीनं हा विक्रमी टप्पा गाठला आहे.
सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
महेंद्रसिंग धोनीनं आजवरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीत 98 सामन्यात यष्टीमागे 91 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्यात 57 झेल आणि 34 यष्टीचीतचा समावेश आहे. हिलीनं आज ब्रिस्बेनमध्ये झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडच्या अॅमी सदरवेटला यष्टीचीत करत धोनीचा विक्रम मोडीत काढला. हिलीनं 114 सामन्यात ही कामगिरी बजावली.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक (पुरुष/महिला) :
एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) - 92
महेंद्रसिंग धोनी (भारत) - 91
सारा टेलर (इंग्लंड) - 74
रिचेल प्रीस्ट (न्यूझीलंड) - 72
दिनेश रामदिन (वेस्ट इंडिज) - 71
एलिसा हिलीची अशीही ओळख
एलिसा हिलीची ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर आणि यशस्वी यष्टीरक्षक अशी ओळख आहेच. पण ती ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी आहे. पुरुषांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिचेस स्टार्कचं नाव अव्वल गोलंदाजात घेतलं जातं. हिलीनंही त्याच्याच खांद्याला खांदा लावून महिला क्रिकेटमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.
Sunil Gavaskar Vs Anushka | सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काची तिखट प्रतिक्रिया