दुबई: आतापर्यंत तीन वेळा आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेल्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामात विजयासाठी झगडावे लागत आहे. आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 44 व्या सामन्यात त्यांचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून धोनीचा CSK आपला सन्मान टिकवण्याचा प्रयत्न करेल. शुक्रवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरोधातल्या सामन्यात CSK ला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ने आतापर्यंत 10 सामन्यांपैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे आणि गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायजर्स ला आठ विकेटनी हारवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आज विजय प्राप्त करून RCB आपले गुणतालिकेतील रनरेट सुधारण्यावर भर देण्याच्या प्रयत्नात असेल. त्याचा फायदा त्यांना प्ले ऑफ मध्ये होईल.


तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्जचा संघ केवळ तीन सामन्यात विजयी होऊ शकला आहे आणि गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. प्ले ऑफ मध्ये पोहचायची त्याची सगळी आशा जवळपास संपुष्टात आली आहे. असे जर झाले तर CSK संघावर 2008 नंतर पहिल्यांदाच प्ले ऑफच्या बाहेर पडण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.


या हंगामात CSK आणि RCB हे दोन संघ एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ आहे. या दोन संघादरम्यान झालेल्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या 52 चेंडूतील 90 धावांच्या खेळीमुळे RCB ने CSK चा 37 धावांनी पराभव केला होता. आज होणाऱ्या या सामन्याच्या निमित्ताने RCB चा संघ CSK च्या विरोधातील आपला दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला CSK चा संघ आतापर्यंत झालेल्या चुका सुधारून या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल.


चेन्नई सुपर किंग्स :CSK


महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दिपक चहर, पीयूष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सेंटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरेन, एन. जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर. साई किशोर, ऋतुराज गायकवाड़, करण शर्मा.


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:RCB


विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, आरोन फिंच, जोश फिलिप, क्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, अॅडम जंपा