IPL 2020, MIvsRR: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 मध्ये मुंबई इंडियन्स मोसमातील 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससोबत भिडणार आहे. या दोन्ही संघांमधील हा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये तीन विजय नोंदवले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने पहिल्या चार सामन्यात दोन सामन्यात विजय नोंदवला आहे.


शारजाह येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला 34 धावांनी पराभूत केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाला विजयी घोडदौड कायम राखण्याची इच्छा आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध राजस्थानला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा संघ मुंबई विरुद्ध विजयी मिळवून पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आजची स्पर्धा अटीतटीची होण्याची शक्यता आहे.


आयपीएलमध्ये आज मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. 2018 साली आयपीएलमध्ये पुनरागमनानंतर राजस्थानचं मुंबईवर वर्चस्व राहिलं आहे. गेल्या चारही सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर मात केली आहे.


पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स सध्या सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये नंबर वनवर पोहोचण्यासाठी मुंबईचा संघ  प्रयत्न करेल.


मुंबई इंडियंस (MI विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR)


सामने : 22


मुंबई इंडियन्स विजयी : 11


राजस्थान रॉयल्स विजयी : 11