तत्पूर्वी, हैदराबादने निर्धारित 20 षटकात पंजाबसमोर 150 धावांचे लक्ष्य उभे केले होते. हैदराबादकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 62 चेंडूत 70 धावांच्या जोरावर संघाला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. वॉर्नर वगळता हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. दोन्ही संघांच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात यश मिळत नसले तरी गोलंदाजांनी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले होते.
पंजाबचा हैदराबादवर सहा विकेट्सनी विजय, के.एल. राहुल आणि मयांक अगरवाल दोघांची अर्धशतके
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2019 12:01 AM (IST)
आयपीएलमध्ये आज अटतटीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.
NEXT
PREV
मोहाली : आयपीएलमध्ये आज अटतटीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. हैदराबादने दिलेले 151 धावांचे आव्हान पंजाबने अखेरच्या षटकात पूर्ण केले. के.एल. राहुलच्या 53 चेंडूत 71 धावा आणि मयांक अगरवालच्या 43 चेंडूत 55 धावांच्या जोरावर पंजाबने आजचा सामना खिशात घातला.
तत्पूर्वी, हैदराबादने निर्धारित 20 षटकात पंजाबसमोर 150 धावांचे लक्ष्य उभे केले होते. हैदराबादकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 62 चेंडूत 70 धावांच्या जोरावर संघाला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. वॉर्नर वगळता हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. दोन्ही संघांच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात यश मिळत नसले तरी गोलंदाजांनी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले होते.
तत्पूर्वी, हैदराबादने निर्धारित 20 षटकात पंजाबसमोर 150 धावांचे लक्ष्य उभे केले होते. हैदराबादकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 62 चेंडूत 70 धावांच्या जोरावर संघाला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. वॉर्नर वगळता हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. दोन्ही संघांच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात यश मिळत नसले तरी गोलंदाजांनी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -