कोलकाता: शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिकनं रचलेल्या 83 धावांच्या अभेद्य भागिदारीनं, कोलकाता नाईट रायडर्सला चेन्नई सुपर किंग्सवर सहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला कोलकात्याचा हा पाचवा विजय, तर चेन्नईचा तिसरा पराभव ठरला.
या सामन्यात चेन्नईनं वीस षटकांत पाच बाद 177 धावांची मजल मारली होती. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची चार बाद 97 अशी अवस्था झाली होती.
पण शुभमन गिलनं 36 चेंडूंत नाबाद 57 आणि दिनेश कार्तिकनं 18 चेंडूंत नाबाद 45 धावांची खेळी उभारून कोलकात्याला मोठा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून फॅब ड्युप्लेसी आणि शेन वॉटसन यांनी दमदार सलामी दिली. ड्युप्लेसीने 15 चेंडूत 27 तर वॉटसनने 25 चेंडूत 36 धावा ठोकल्या.
त्यानंतर रैनाने 26 चेंडूत 31 धावा केल्या. मात्र रायुडूला मोठी खेळी करता आली नाही. तो 17 चेंडूत 21 धावा करुन माघारी परतला. कर्णधार धोनी 25 चेंडूत 43 धावा करत नाबाद राहिला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएल 2018: शुभमन गिल चमकला, कोलकात्याची चेन्नईवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 May 2018 07:58 AM (IST)
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला कोलकात्याचा हा पाचवा विजय, तर चेन्नईचा तिसरा पराभव ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -