मुंबई : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या नाराज कुटुंबियांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केला आहे.


चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलगा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला आहे.

https://twitter.com/vaibhavparab21/status/992059912007049216

आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान वनगा कुटुंबियांनी केलेल्या आरोपांशी आपण सहमत नाबी असं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले.

वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान वनगा कुटुंबियांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी विष्णू सावरा यांना फोन केला. विष्णू सावरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले.