बंगळुरु: आयपीएलच्या दहाव्या मोसमात पहिल्या हॅटट्रिकची नोंद झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज सॅम्युअल्स बद्रीने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत, हॅटट्रिक नोंदवली.

बद्रीने तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पार्थिव पटेल (3), मॅग्लेघन (0) आणि कर्णधार रोहित शर्मा (0) यांना माघारी धाडून मुंबईला जोरदार हादरे दिले.

या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बंगळुरुने  मुंबईला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची तिसऱ्याच षटकात चार बाद 7 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि नितीश राणानं मुंबईची आणखी पडझड होऊ दिलेली नाही.

बद्रीने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 4 विकेट  घेतल्या.

विराट मैदनात

बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली अखेर मैदानात उतरला. कोहलीने 47 चेंडूत 5 चौकरा आणि 2 षटकार ठोकत 62 धावा केल्या. तर ख्रिस गेल 22, ए बी डिव्हिलियर्स 19 यांच्या फटकेबाजीमुळे बंगळुरुला 20 षटकात 5 बाद 142 धावा करता आल्या.