राणेप्रकरणी शिवसेनेची 'वेट अँड वॉच' भूमिका
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2017 04:00 PM (IST)
A
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशाच्या चर्चेने शिवसेना 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे. सध्या राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे, मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये कमलीची अस्वस्थता पाहायला मिळते. एरव्ही राणेंच्या अरे ला का रे करायला पुढे येणारे शिवसेनेचे नेते राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलायला तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार शिवसेनेनं "वेट अँड वॉच" ची भूमिका घेतली असल्याचं कळतंय. एवढंच काय तर नारायण राणे यांच्याविषयी कोणीही माध्यमांशी बोलू नये, असे आदेश शिवसेनेच्या प्रवक्तयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राणें यांची पत्रकार परिषद होऊन 24 तास उलटल्यानंतरही शिवसेना गप्प आहे.