गेलचं वादळ, बंगळुरुचा गुजरातवर 21 धावांनी विजय
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2017 12:03 AM (IST)
राजकोट : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात लायन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुने गुजरातचा 21 धावांनी धुव्वा उडवला. तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल बंगळुरुच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आयपीएलच्या दहाव्या पर्वात गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. ख्रिस गेलनं पाच चौकार आणि सात षटकारांची उधळण करुन 38 चेंडूत 77 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं 64, ट्रॅव्हिस हेडनं नाबाद 30 आणि केदार जाधवनं नाबाद 38 धावांची खेळी करुन गेलला साथ दिली. त्यामुळेच बंगळुरुला 20 षटकांत दोन बाद 213 धावांची मजल मारता आली.