मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणातच सर्वात वेगवान शतक आणि आयसीसी वन डे टूर्नामेंटमध्ये वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारा टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनची लव्ह स्टोरीही अनोखी आहे.
भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियातील एका बॉक्सर असणाऱ्या तरुणीशी शिखर धवनी फेसबुकवरुन मैत्री झाली. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघेही विवाह बंधनात अडकले.
फेसबुकवरुन मैत्री, हरभजन सिंहची मध्यस्थी
आयेशा मुखर्जी या तरुणीचा फोटो शिखर धवनला सर्वात अगोदर हरभजन सिंहकडून पाहायला मिळाला. त्यानतंर ही तरुणी शिखर धवनला आवडली. शिखर धवनने आयेशा मुखर्जीला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली आणि आयेशानेही रिक्वेस्ट स्वीकारली.
फेसबुकवर आयेशा आणि शिखरची मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं रुपांतर काही दिवसांमध्येच प्रेमात झालं. ऑस्ट्रेलियात जन्म घेतलेल्या आयेशाची आई ऑस्ट्रेलियन आहे, तर वडिल पश्चिम बंगालचे आहेत. भारतात पहिल्यांदा शिखरची भेट झाल्यानंतर आपल्याला बंगाली चांगली बोलता येते, असं आयेशाने सांगितलं होतं.
दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर
आयेशा आणि शिखरच्या वयात तब्बल दहा वर्षांचं अंतर आहे. अगोदरच्या पतीपासून आयेशाला दोन मुली आहेत. त्यांचाही स्वीकार शिखरने केला. आयेशाचं पहिलं लग्न झालेलं असल्याने शिखरच्या कुटुंबीयांचा लग्नाला जोरदार विरोध होता. मात्र शिखरच्या आईचा पाठिंबा असल्याने कुटुंबीयांना राजी करण्यात शिखरला यश आलं.
शिखर आणि आयेशाने 2009 साली साखरपुडा केला. मात्र शिखरला भारतीय संघात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शिखरने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयेशा आणि शिखर 2012 साली विवाह बंधनात अडकले.
2012 साली लग्न झाल्यानतंर आयेशाने 2014 साली मुलाला जन्म दिला. आयेशा शिखरच्या अनेक सामन्यांनाही उपस्थित असते. मात्र आयेशाला ऑस्ट्रेलिया ते भारत आणि भारत ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास आजही करावा लागतो.