बीड : सोलापूर-धुळे महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल खचल्याने बीड शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पूल कमकुवत असल्याने गेल्या वर्षीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र एक वर्ष उलटूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध न केल्याने यावर्षी मोठा पेच निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात हा पूल कमकुवत झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहतुकीसाठी नदीच्या पात्रातून पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला होता. मात्र पावसाने तो मार्गही आता खचला आहे.

दरम्यान गेल्या एक वर्षात पर्यायी रस्त्याची किंवा पुलाची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल आता वाहनधारक विचारत आहेत. पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अगोदरपासूनच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, त्यात आता पूल खचल्याने आणखी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.