मुलगी आयसीयूत असतानाही शमी देशासाठी खेळला
शमीने कोलकाता कसोटीमध्ये एकूण 6 गडी बाद केल्याने भारताने या मालिकेवर पकड मजबूत केली. विशेष म्हणजे, भारतीय संघाने कोलकाता कसोटीमध्ये विजय मिळवला, तर दुसरीकडे शमीच्या तान्हुलीला डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशमीच्या मुलीला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. शमी सामना संपल्यानंतर रोज तिला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होता.
कोलकाताच्या इडन गार्डनवर टीम इंडिया आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 178 धावांनी विजय मिळवला. या विजयाने भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली.
दुसऱ्या कसोटीच्या विजयात टीम इंडियाच्या गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका होती. टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी एकीकडे आपल्या गोलंदाजीने किवींना मैदानावर टिकू देत नव्हता, तर दुसरीकडे मात्र त्याची 14 महिन्याची तान्हुली आयसीयूमध्ये दाखल होती.
शमीची 14 महिन्यांची मुलगी सामना सुरु होण्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णालयात दाखल आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये दाखल केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -