रांची: चेतेश्वर पुजारानं रांची कसोटीत झळकावलेलं द्विशतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचं दुसरं ट्विशतक ठरलं.


याआधी भारताकडून केवळ व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरनंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन द्विशतकं ठोकली होती.

चेतेश्वर पुजारानं 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद कसोटीत 204 धावांची खेळी केली होती. तर रांचीत त्यानं 202 धावा फटकावल्या.

त्याआधी 2012 साली पुजारानं इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद कसोटीत नाबाद 206 धावांची खेळी केली होती. चेतेश्वर पुजाराच्या खात्यात आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 द्विशतकं जमा झाली असून त्यानं विजय मर्चंट यांच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी साधली आहे.

दरम्यान, रांची कसोटीत पुजारानं तब्बल 525 चेंडू खेळून काढले. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 500 चेंडू खेळून काढणारा पुजारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

याआधी द्रविडनं 2004 साली पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी कसोटीत 495 चेंडू खेळून काढले होते आणि 270 धावा केल्या होत्या. रांची कसोटीत पुजारानं तब्बल अकरा तास फलंदाजी केली.

संबंधित बातम्या
पुजाराला बाद घोषित करण्यासाठी अम्पायरनं बोट वर केलं पण...