मीडियाशी बोलताना कोहली म्हणाला की, 'आमचं कसोटी मालिकेकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी ही निष्फळ चर्चा सुरु आहे. वृत्तपत्रामध्ये काय छापून येतं याकडे मी फार लक्ष देत नाही. जोवर आयसीसी माझ्याकडे काही विचारणा करीत नाही तोवर त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. जर मी काही चुकीचं केलं असतं तर आयसीसीनं माझी नक्कीच चौकशी केली असती.'
पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडवर 246 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानं भारतानं मालिकेत 1-0नं बढत घेतली होती.
दरम्यान, दुसऱ्या कसोटीवेळीच ब्रिटीश मीडियानं विराटवर आगपाखड सुरु केली होती. ब्रिटीश मीडियानुसार विराटनं चेंडूला लकाकी आणण्यासाठी मिन्टमिश्रित थुंकीचा वापर केला होता.
कर्णधार कोहलीवरील या आरोपांबाबत गुरुवारी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनंही उत्तर दिलं होतं. कुंबळेच्या मते, 'याबाबत बरंच काही म्हटलं आणि लिहलं गेलं आहे. हे फक्त आरोप आहेत. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही. मी लोकांच्या आरोपावर काहीही उत्तर देणार नाही.'
दरम्यान, तिसऱ्या कसोटीबाबत बोलताना कर्णधार विराट म्हणाला की, 'आम्ही प्रत्येक सामना कसा खेळतो याकडे आम्हाला लक्ष द्यायला हवं.'
VIDEO: