Sania Mirza Retirement Tennis India : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने टेनिसला अलविदा केला असून प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा एक सोशल मीडिया पोस्ट करत सानियाने दिली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असून यासाठी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचं एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली आहे.


सानियाने तित्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अगदी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. यावेळी ती ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि त्याला आता माझी अधिक गरज असल्याचं सांगत निवृत्ती घेत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ''30 वर्षांपूर्वी हैदराबादमधील एक सहा वर्षांची मुलगी पहिल्यांदा टेनिस कोर्टवर गेली, तिच्या आईसोबत गेली आणि प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे हे समजावून सांगितले. मला वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांचा लढा वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाला.'' अशा आशयाची एक भलीमोठी पोस्ट लिहित सानियाने निवृत्ती जाहिर केली आहे. सानियाच्या या पोस्टमध्ये तिच्या बालपणीच्या फोटोंसह तरुणपणीचे फोटोही दिसून येत आहेत.






दमदार राहिली सानिया मिर्झाची कारकीर्द


सानिया मिर्झा दुहेरी टेनिस स्पर्धेत 3 वेळा चॅम्पियन ठरली आहे. यामध्ये तिने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय सानिया मिर्झाने महिला दुहेरीत 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. जरी, सानिया मिर्झाला तिच्या टेनिस कारकिर्दीत ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये एकही विजेतेपद जिंकता आले नाही, परंतु एकेरीशिवाय तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावले आहेत. सानिया मिर्झाने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर, 2012 मध्ये, त्याने फ्रेंच ओपनचे मिश्र दुहेरी जिंकले. तर 2014 मध्ये तिने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलिया ओपन 2023 हे तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, तिने सांगितले होते की ऑस्ट्रेलियन ओपननंतर ती दुबई येथे होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेईल, ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिपनंतर सानिया मिर्झा टेनिसला अलविदा करणार आहे, अशी माहिती समोर येत होती. आता तिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर केली आहे.


हे देखील वाचा-