Diamond Crossing In Nagpur : रेल्वेतून प्रवास प्रत्येकाने केला असेल. ट्रेनमधील प्रवासादरम्यान तुम्ही अनेक वेळा एक ट्रॅक दुसऱ्या ट्रॅकला जोडताना पाहिलं असेल. एक ट्रॅक दुसरा ट्रॅक ओलांडत असल्याचेही तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण, भारतात अंस एक ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी एक-दोन नाही तर चक्क चार दिशांनी गाड्या येतात. हे एकून तुम्हालाही कदाचित आश्चर्याचा धक्का बसला असेल. तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की चार दिशांना ट्रॅक असल्यामुळे या गाड्या एकमेकांवर आदळत नाहीत का? खरंतर या गाड्या अशा पद्धतीने चालवल्या जातात की त्या एकमेकांना न आदळता सुरक्षितपणे काढता येतील. जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या या अनोख्या रेल्वे क्रॉसिंगबद्दल. 


रेल्वेचे डायमंड क्रॉसिंग


भारतीय रेल्वेच्या या अनोख्या क्रॉसिंगला डायमंड क्रॉसिंग असं म्हणतात. कारण, या ठिकाणी चारही दिशांनी गाड्या येतात. त्यामुळे येथे एकाच ठिकाणी चार रेल्वे रुळ ओलांडत आहेत. यामुळे येथे हिऱ्याचा आकार तयार होतो, म्हणून या क्रॉसिंगचे नाव डायमंड क्रॉसिंग आहे. इथे एकाच ठिकाणी उभे राहिल्यास चार वेगवेगळ्या दिशांना चार रेल्वे रुळ दिसतात.


हे डायमंड क्रॉसिंग कुठे आहे?


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायमंड क्रॉसिंग भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे आणि हे ठिकाण महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. हे डायमंड क्रॉसिंग सध्या नागपूरच्या मोहन नगर, समृद्धी नगरमध्ये आहे. हे 24 तास खुले असले तरी येथे जास्त काळ राहण्याची परवानगी नाही. कारण, आजूबाजूचा भाग रेल्वेच्या आत येतो. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकजवळ उभे राहण्यास परवानगी नाही. मात्र, डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येत असतात.


चारही दिशांना ट्रॅक 


येथे चारही दिशांनी येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर वेगवेगळ्या गाड्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वेकडील गोंदियाकडून येणारा ट्रॅक हावडा-रौरकेला-रायपूर मार्ग आहे. एक ट्रॅक दक्षिण भारतातून येतो आणि एक ट्रॅक दिल्लीकडून येतो, जो उत्तरेकडून येतो. या ठिकाणी पश्चिम मुंबईकडूनही एक ट्रॅक येत आहे. अशाप्रकारे चारही दिशांचे ट्रॅक इथे एकाच ठिकाणी मिळतात. मात्र, एकाच वेळी दोन गाड्या ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे क्रॉसिंगवर गाड्यांची पासिंगची वेळ वेगळी ठरवली जाते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा पाय फ्रॅक्चर, नवरीने केलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क