Indian Hockey Team Won At 5s Asia Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवत बाजी मारली. शनिवारी भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप 5s चषकाव नाव कोरले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगतदार झाला. सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. अखेर पेनेल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने २-० ने बाजी मारत चषकावर नाव कोरले. भारताच्या रोमहर्षक विजयानंतर खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. फायनलमधील भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले.
पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर (एक्स) हॉकी टीम इंडिाचा फोटो पोस्ट करत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,
“हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेते! !
भारतीय पुरुष हॉकी संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी5 विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”
पाहा पंतप्रधान मोदींचे ट्वीट
शूटआऊटमध्ये भारताकडून मनिंदर सिंह आणि गुरज्योत सिंह यांनी गोल केले. भारताचा यष्टिरक्षक सूरज करकेराने पाकिस्तानच्या अर्शद लियाकत आणि मोहम्मद मुर्तझा यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यापासून रोखले. भारताकडून मोहम्मद राहिलने सामन्यात दोन गोल केले. याशिवाय जुगराज सिंह आणि मनिंदर सिंह यांनी 1-1 गोल केला. राहिलने 19व्या आणि 26व्या मिनिटाला संघासाठी गोल केला. 7व्या मिनिटाला जुगराज सिंगने तर 10व्या मिनिटाला मनिंदर सिंह याने गोल केला. तर पाकिस्तानसाठी अब्दुल रहमान, झिकारिया हयात, अर्शद लियाकत आणि कर्णधार अब्दुल राणा यांनी १-१ गोल केला.