मुंबई : अमेरिकेत होणाऱ्या वेस्ट इंडिजविरोधातील टी 20 मालिकेसाठी भारतीय संघची निवड झाली आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

 
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये 27 आणि 28 ऑगस्टला भारतीय संघ दोन ट्वेन्टी20 सामन्यांत वेस्ट इंडिजचा मुकाबला करणार आहे. त्या मालिकेसाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं 14 जणांचा भारतीय संघ जाहीर केला.

 
कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अमित मिश्रा आणि स्टुअर्ट बिन्नीचा समावेश आहे.