Sachin Tendulkar On Serena Williams: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) यूएस ओपन 2022 च्या (US Open 2022) तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलीय. यानंतर सेरेना विल्यम्सच्या निवृत्तीची चर्चा सुरू झालीय. या स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी सेरेनानं टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. यूएस ओपन 2022 ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, असंही तिनं त्यावेळी म्हटलं होतं. दरम्यान, अनेक दिग्गज सेरेना विल्यम्सला तिच्या दमदार कारकिर्दीबद्दल शुभेच्छा देत आहेत. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही (Sachin Tendulkar) सेरेना विल्यम्सला तिच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


सेरेना विल्यम्ससाठी सचिन तेंडुलकर यांनी ट्वीट केलेल्या असं म्हटलंय की, "तुमच्या वयापेक्षा तुमचं मन तुमच्या शरीराला काय सांगतं हे महत्वाचं आहे. तरुण लोक जगातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकतात. तर, प्रौढ लोक नव्या गोष्टींना आत्मसात करून त्यात आणखी काही चांगल्या गोष्टींची भर देऊ शकतात. खेळ ही अशीच एक गोष्ट आहे जी समाजाला त्यांच्या मर्यादेपलीकडे जाण्याची प्रेरणा देते आणि अशक्य गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांना धैर्य देते. सेरेना विल्यम्सच्या तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा."


सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट-



दीड वर्षांपासून सेरेनाची खराब फॉर्मशी झुंज
टेनिसमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर जगावर छाप सोडणारी सेरेना विल्यम्स जवळपास दीड वर्ष खराब फॉर्मशी झुंज देत होती. यूएस स्पर्धेपूर्वी तिला गेल्या 450 दिवसांत फक्त एकच सामना जिंकता आला होता. तसेच तिच्या क्रमवारीतही सातत्यानं घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, सेरेना विल्यम्सनं टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला . यूएस ओपन स्पर्धा ही तिच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल, असंही तिनं म्हटलं होतं. यूएस ओपन स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला. या पराभवासह तिचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. ज्यामुळं सेरेना ही लवकरच निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.


पराभवानंतर सेरेना भावूक
यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर सेरेनानं चाहत्यांना ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, त्यानुसार तिची निवृत्ती निश्चित मानली जात आहे. सेरेना म्हणाली की, "तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही सर्व आश्चर्यकारक आहात. धन्यवाद बाबा, मला माहित आहे की, मला तुम्ही बघतच असाल. धन्यवाद आई. अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या तुम्हा सर्वांचे मी येथे आभार मानू इच्छिते. हे सर्व माझ्या पालकांपासून सुरू झाले. मी त्यांची आभारी आहे. मला माहित नाही, कदाचित हे आनंदाचे अश्रू आहेत."


हे देखील वाचा-