Happy Birthday Mohammad Shami: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे. मोहम्मद शामीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला जात आहे. बीसीसीआयपासून (BCCI) ते स्टार खेळाडू आणि चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावर (Social Media) मोहम्मद शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.


आशिया चषकात मोहम्मद शामी भारताच्या टी-20 विश्वचषकाचा भाग नाही. अलीकडची कामगिरी आणि भविष्यातील रणनीती पाहता मोहम्मद शमीला टी-20 विश्वचषकातही स्थान दिलं जाणार नाही, असं मानलं जात आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं मोहम्मद शमीचा समावेश करावा, अशी मागणींनी जोर धरलाय.


बीसीसीआयचं ट्वीट-



चेतेश्वर पुजाराचं ट्वीट-


मोहम्मद कैफचं ट्वीट-


पंजाब किंग्जचं ट्वीट-


गुजरात टायटन्सचं ट्वीट-


भारत आर्मीचं ट्वीट-


एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज
मोहम्मद शामीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. त्यानं 80 सामन्यात अशी कामगिरी केलीय. क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा जगातील तिसरा वेगवान गोलंदाज आहे. 


टी-20 विश्वचषकापासून मोहम्मद शामी संघाबाहेर
मोहम्मद शामीनं भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषकात अखेरचा टी-20 सामना खेळला होता. या स्पर्धेनंतर मोहम्मद शामीला भारतीय संघात संधी मिळाली नाही. दरम्यान, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान, हार्दिक पांड्या यांसारखे गोलंदाज भारतीय टी-20 संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. ज्यामुळं मोहम्मद शामीचं भारतीय टी-20 संघात स्थान मिळवणं थोडं कठीण मानलं जातंय.


मोहम्मद शामीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
मोहम्मद शामीनं आतापर्यंत 60 कसोटी, 82 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. मोहम्मद शामीनं कसोटी क्रिकेटमध्ये 216 विकेट्स घेतल्या होत्या. तर, एकदिवसीय  क्रिकेट 152 विकेट्स मिळवल्या होत्या. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 विकेट्सची नोंद आहे.


हे देखील वाचा-