चेन्नई: कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विननं आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करुन अश्विननं याची माहिती दिली. अश्विननं रोटरी राजन (आय बँकेला) आपले डोळे दान केले आहेत.


अश्विननं सोशल मीडिया पेजवर याविषयी माहिती दिली, 'मी माझे डोळे दान केले! तुम्हीही सहकार्य करा'


आर. अश्विन नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत सध्या वेळ घालवित आहे.

इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेसाठी अश्विनला संघात स्थान देण्यात आलं आहे. तो भारताचा प्रमुख फिरकीपटू आहे. अश्विननं कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली 2010 साली वनडे आणि टी20 मध्ये तर 2011 साली कसोटी संघात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. कसोटीत 248, आणि वनडेमध्ये 142 आणि टी-20मध्ये 52 विकेट घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीनं अश्विननं संघात आपलं महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 35च्या सरासरीने 1800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.