- विराट कोहली (कर्णधार)
- मयांक अग्रवाल
- रोहित शर्मा
- चेतेश्वर पुजारा
- अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार)
- हनुमा विहारी
- ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
- वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक)
- रविचंद्रन आश्विन
- रविंद्र जाडेजा
- कुलदीप यादव
- मोहम्मद शमी
- जसप्रीत बुमराह
- इशांत शर्मा
- शुभमन गिल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू तर शुभमन गिलला संधी
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई | 12 Sep 2019 05:37 PM (IST)
2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान विशाखापट्टणमध्ये खेळवण्यात येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विंडीज दौऱ्यात खराब कामगिरी केलेल्या लोकेश राहुलला वगळून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भरीव योगदान देणाऱ्या शुभमन गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर रोहित शर्माला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहेत. त्यातला पहिला कसोटी सामना 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान विशाखापट्टणमध्ये खेळवण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :