ढाका: भारताच्या युवा हॉकीपटूंनी अंडर 18 आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या या स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत यजमान बांगलादेशवरच मात केली.


भारतानं हा सामना 5-4 असा जिंकला आणि चौथ्यांदा अंडर 18 आशिया चषक जिंकला. त्याआधी उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानला हरवलं होतं.

भारतानं सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमणं केली. त्यामुळे बांगलादेशचा संघ या आक्रमणांना तोंड देऊ शकलं नाही. त्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.