अहमदनगर : दसरा मेळाव्यावरुन वादाचं केंद्र बनलेल्या भगवान गडावरील वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर बीडच्या शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केज पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

जमाव जमा करुन धक्काबुक्की करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप नामदेव शास्त्रींवर आहे.

महाराजांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्याला धक्काबुक्की केली होती. तसंच तरुणांना आपल्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. इतकंच नव्हे तर महाराजांना दसरा मेळाव्या संदर्भात एसएमएस केला असता त्यांनी रिव्हॉल्वरनं गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं आरोप, घुलेंनी केला आहे.