India Women vs England Women Cricket T20I : बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ (India Women Cricket) आणि इंग्लंड (England Women Cricket)यांच्यात काल अभूतपूर्व सामना रंगला. यावेळी इंग्लंड महिला संघाने भारतावर 9 गडी राखून मात केली. यजमान इंग्लंडच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांनी भारतावर 9 गडी राखून सहज विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने आता 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


भारताचा 9 गडी राखून पराभव 
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय महिला संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही निस्तेज दिसली. प्रथम फलंदाजी करताना भारताने यजमानांसमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या दीप्ती शर्माने 7व्या क्रमांकावर येऊन 29 धावांची नाबाद खेळी खेळली. ही सोपी धावसंख्या इंग्लंडने 7 षटके आणि 9 विकेट्स शिल्लक असताना सहज गाठली. मालिकेतील पुढील सामना 13 सप्टेंबर रोजी डर्बी येथील काउंटी मैदानावर खेळवला जाईल.


भारतीय फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही


या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देताना स्मृती मानधना (23) आणि शेफाली वर्मा (14) यांनी पहिल्या विकेटसाठी 4 षटकांत 30 धावा केल्या होत्या, मात्र दोन्ही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. पॉवरप्लेमध्ये भारताने या दोन खेळाडूंच्या विकेट्स गमावून 47 धावा केल्या होत्या. मधल्या फळीतील फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. यादरम्यान कर्णधार हरमनप्रीतने 20 धावांची खेळी केली. शेवटी, दीप्तीने 24 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 29 धावा करत भारताची धावसंख्या 132 पर्यंत नेली. इंग्लंडकडून सारा ग्लेनने 4 विकेट घेतल्या. या छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांची इंग्लंडने धुव्वा उडवला. सोफिया डंकलेने 44 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 61 धावांची खेळी केली, तर एलिस कॅप्सीही 20 चेंडूत नाबाद 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. 


पुढील सामना 13 सप्टेंबरला डर्बी येथील काउंटी मैदानावर


इंग्लंड येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात असून या मालिकेतील पहिला सामना काल रिव्हरसाईड ग्राऊंड येथे खेळला गेला. मालिकेतील पुढील सामना 13 सप्टेंबर रोजी डर्बी येथील काउंटी मैदानावर खेळवला जाईलभारताविरुद्ध टी-20 मालिकेत इंग्लंडच्या संघाला संघर्ष करावा लागला. हीदर नाइट, नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांसारखे खेळाडू या मालिकेचा भाग नव्हते. दुसरीकडं दुखापतीमुळं बाहेर पडलेल्या जेमिमा रॉड्रिग्जला विश्रांती देण्यात आली होती