CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Birmingham Commonwealth Games 2022) दहाव्या दिवशी कांस्यपदकासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत केलंय. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. मात्र, यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला. भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयामुळं भारताच्या झोळीत आणखी कांस्यपदक पदक पडलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताची पदकसंख्या 41 वर गेलीय. ज्यात 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकाचा समावेश आहे. 


पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल नाही
भारतीय महिला हॉकी संघ आणि न्यूझीलंड महिला हॉकी संघात आज कांस्यपदाकासाठी सामना रंगला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं चेंडू स्वत:जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, तरीही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. 


दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा पहिला गोल
दुसऱ्या क्वार्टरच्या 14व्या मिनिटाला भारतानं पहिला गोल केला. सलीमा टेटेनं गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.


तिसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडचं कमबॅक
तिसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटच्या क्षणी न्यूझीलंडच्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यात फायदा घेत न्यूझीलंडनं करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला.


भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू


सुवर्णपदक- 15
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू घणघस, अमित पंघाल.


रौप्यपदक- 11
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ.


कांस्यपदक- 17
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ.