India Wins Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) जिंकल्यानंतर भारताने दुबईत तिरंगा फडकवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत 12 वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघाचे (IND Vs NZ) नाव कोरलंय. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माने (Rohit Sharma सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर केएल राहुलने 34 धावांची नाबाद खेळी खेळी खेळत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. यासह भारत जगातील सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघावरही पैशांचा वर्षाव झाला. यात अंतिम सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला ICC कडून सुमारे 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर उपविजेत्या न्यूझीलंडला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 9.72 कोटी रुपये मिळतील. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले होते. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला ही बक्षीस रक्कम कोण देणार?
यजमान देश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रक्कम देतो का?
पुढे आलेल्या माहितीनुसार, ICC T20 विश्वचषक 2021 दरम्यान पाकिस्तान ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे आयोजन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडला. आयसीसीच्या नियमांनुसार, ज्या देशाला स्पर्धेची जबाबदारी दिली जाते, तो तेथे होणाऱ्या सामन्यांचा संपूर्ण खर्च उचलतो. याशिवाय यजमान देश खेळाडूंच्या सुरक्षेची, त्यांच्यासाठी वाहतूक आणि निवासाची व्यवस्था करतो. जोपर्यंत बक्षीस रकमेचा संबंध आहे, ती यजमान देशाची जबाबदारी नाही.
अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या सामन्याला ICC बक्षीस रक्कम देईल
कोणत्याही स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम आयसीसीकडून जाहीर केली जाते. स्पर्धेच्या सुरुवातीला आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 6.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 59 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. हे 2017 मध्ये झालेल्या सामन्यापेक्षा 53 टक्के अधिक आहे. यामध्ये भारतीय संघाला सुमारे 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या न्यूझीलंडला 9.72 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 4.85 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. ही बक्षीस रक्कम आयसीसीकडून विजेत्या संघाला दिली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या