नवी दिल्ली : भारतीय संघ या वर्षअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात परदेशातली पहिली डे नाईट कसोटी खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यातही टीम इंडिया डे नाईट कसोटी खेळेल अशी शक्यता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं वर्तवली आहे. गेल्या वर्षी कोलकात्यात टीम इंडियानं बांगलादेशविरुद्ध पहिला डे नाईट कसोटी सामना खेळला होता. मात्र ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर गुलाबी चेंडूवर खेळणं टीम इंडियासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.


परदेशात ही भारताची ही पहिली पिंक बॉल टेस्ट मॅच आहे. यापूर्वी टीम इंडियाने डे नाइट टेस्ट मॅच खेळण्यास नकार दिला होता. 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया कसोटी सामन्याच्या मालिकेत एक कसोटी गुलाबी चेंडूने खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा टीम इंडियाने गुलाबी चेंडूचा अनुभव नसल्याचे कारण देत कर्णधार विराट कोहली आणि संघाने माघार घेतली होती. 2015 साली मध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूवर कसोटीची सुरुवात झाली होती


याबरोबरच बांग्लादेशनंतर आता भारतीय संघ घरच्या मैदनावर इंग्लडबरोबर देखील डे-नाइट टेस्ट मॅच खेळणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले . भारतीय संघाने पहिला जे नाइट टेस्ट मॅच गेल्या वर्षी बांग्लादेश विरूद्ध इडन गार्डन येथे खेळला होता. या सामन्यात संघाने सहज विजय मिळाला होता.

 Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha



संबंधित बातम्या : 

IPL 2020 Timetable | मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पहिला सामना 29 मार्चला, पाहा संपर्ण वेळापत्रक

रणजी करंडकाच्या बाद फेरीचं चित्र स्पष्ट ; महाराष्ट्र, मुंबई, विदर्भाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात