जमैका : विराट कोहलीच्या टीम इंडियाने जमैकाच्या एकमेव ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीच्या दिलेल्या संधीचं भारतीयांनी सोनं केलं.

कर्णधार विराट कोहली (39) आणि शिखर धवनने (23) 64 धावांची वेगवान सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला. मग ऋषभ पंत (38) आणि दिनेश कार्तिकने (48) 75 धावांची भागीदारी रचली.

जेरम टेलरच्या एकाच षटकात महेंद्रसिंह धोनी (2) आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये भारताच्या धावांचा वेग मंदावला. रवींद्र जाडेजा आणि 13 आणि आर. अश्विन 11 यांनी 190 धावांपर्यंत मजल मारण्यात मोलाची भूमिका निभावली.