मुंबई जिल्हा फुटबॉलच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंचा विजय
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2017 08:13 PM (IST)
मुंबई : युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे निवडणुकीला उभे राहणारे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे सर्वाधिक 147 मतं मिळवून निवडून आले. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील अख्खं पॅनेल निवडून आलं. त्यामुळे आता मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आदित्य ठाकरे याआधीही मुंबई फुटबॉलच्या चेअरमन पदावर होते. पण त्या वेळी कार्यकारिणीने त्यांना स्वीकृत केलं होतं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी लढवलेली मुंबई फुटबॉलची निवडणूक ही बाब शिवसेना आणि ठाकरे घराण्यातल्या परिवर्तनाची चाहूल मानण्यात येत आहे.