India Vs South Africa T 20 World Cup Final : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने दिमाखदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेला नमवून या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतातील कोट्यवधी क्रिकेटचाहते या विजयाची वाट पाहात होते. अखेर रोहित शर्माच्या या ब्रिगेडने भारतीयांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. तब्बल 17 वर्षांनी भारताने टी-20 विश्वचषकावर विजयाची मोहोर उठवली आहे. दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी यानेदेखील भारतीय संघाचे आपल्या खास स्टाईने अभिनंदन केले आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या अभिनंदनाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने धोनीच्या या शुभेच्छावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आदराने शेवटी हात जोडले आहेत. 


17 वर्षांनी भारताची विजयी कामगिरी


महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने 2007 साली शेवटचा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला या मालिकेतील विजयाची प्रतीक्षाच होती. आता मात्र रोहित शर्माच्या टीमने तब्बल 17 वर्षांनी हा चषक भारतात आणला आहे. 2007 साली भारताने पाकिस्तानला पाच धावांनी धूळ चाखली होती. याच कामगिरीमुळे टी-20 विश्वचषक आणि धोनीचे एक खास नाते आहे.






महेंद्रसिंह धोनी नेमकं काय म्हणाला? 


सध्या धोनी भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही. पण भारताच्या सध्याच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत भारतीय संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण या विजयानंतर साधारण एका वर्षाने इन्स्टाग्रावर खास पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये "सामना चालू असताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. सामन्यादरम्यान तुम्ही शांत राहून, स्वत:वर विश्वास ठेवून खेळ खेळला. विश्वचषक भारतात आणल्याबद्दल भारतातील प्रत्येक नागरिकाकडून तुमचे खूप खूप आभार. वाढदिवासाच्या खास गिफ्टसाठी तुमचे धन्यवाद," अशा भावना महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केल्या. 


रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?


रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या शुभेच्छांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा एक महान खेळाडू राहिलेला आहे. त्याने आपल्या संघाचे कौतुक केले त्यामुळे मला आनंद झाला. देशातील प्रत्येकालाच हा विजय व्हावा असे वाटत होते, शेवटी हा विजय मिळाला. मी खूप आनंदी आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. विशेष म्हणजे त्याने ही प्रतिक्रिया देताना वर आकाशाकडे पाहत आदराने हात जोडले.  






विराट कोहली सामनावीर, बुमराह मालिकावीर


दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 20 षटकांत 176 धावा केल्या होत्या. या खेळात विराट कोहलीने दमदार कामगिरी करत 76 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 169 धावाच करता आल्या. सामनावीर विराट कोहली तर जसप्रित बुमराह हा मालिकावीर घोषित करण्यात आला.


हेही वाचा :


विश्वषचक हातात धरताच जंटलमन राहुल द्रविडचा शांत आवेश झटक्यात बदलला; सेलिब्रेशन पाहून सगळेचं पाहत राहिले


T20 World Cup 2024 Final: जसप्रीत बुमराह ठरला टी-20 विश्वचषकाचा 'Player Of The Tournament'; पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक