भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचे आगामी सामने रद्द?
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 08:01 AM (IST)
नवी दिल्लीः भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचे आगामी सामने रद्द होण्याची शक्यता आहे. लोढा समितीने बँकांना बीसीसीआयची खाती गोठवण्याचे आदेश दिल्याने ही नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्याआधी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत बीसीसीआयशी संलग्न संस्थांना मोठा निधी मंजूर केला. लोढा समितीच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास बीसीसीआय कोणताही परतावा देऊ शकणार नाही. त्यामुळे पुढच्या सर्वच सामन्यांवर गंडांतर येऊ शकतं. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान अजून एक कसोटी सामना, आणि पाच वनडे सामने खेळवले जाणार आहेत. पण ते सर्वच सामने धोक्यात आले आहेत.