सातारा: वाईमधील रविवार पेठमधील एका इमारतीच्या तळमजल्याला आग


हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने टिळकनगर ते कुर्लादरम्यान लोकल खोळंबल्या, लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवाशांची गर्दी, ट्रान्सहार्बर मार्गावरही ठाण्याहून पनवेलकडे जाणारी वाहतूक उशीराने

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार

----------------------------------------------

जम्मूहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या झेलम एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले, जालंधर ते लुधियाना दरम्यान फिलौर येथे दुर्घटना, दोन जण जखमी

----------------------------------------------

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांच्या घरावरचं ठिय्या आंदोलन 16 तासांनंतर मागे, किसान सभेच्या चार मागण्या सरकारला मान्य, 7 ऑक्टोबरला मागण्यांवर सविस्तर चर्चेची तयारी

----------------------------------------------

मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत शिवसेनेच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का,  महापौरांसह प्रवीण छेडा आणि संदीप देशपांडेंच्या वॉर्डवर गंडांतर

----------------------------------------------

बेहिशेबी मालमत्तेप्रकऱणी अटकेत असलेल्या भुजबळांसाठी शक्तीप्रदर्शन, मुंडे आणि आव्हाडही मोर्चात, छावाकडून मात्र पोलिसात तक्रार

----------------------------------------------

मराठा आंदोलनाला वेगळं वळण लागलं तर सरकार जबाबदार, नारायण राणेंचा इशारा, साताऱ्याच्या विराट मोर्चात उदयनराजे स्टेजवर

----------------------------------------------

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, 16 लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानंतर विखे- मुंडेंची मागणी, मराठवाड्यातील आजच्या कॅबिनेट बैठकीकडे लक्ष

----------------------------------------------

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकमध्ये हालचाली, पाक लष्करप्रमुख राहिल यांच्याकडून लढाऊ विमानांची पाहणी, तर जवान चंदू चव्हाण पाकच्या ताब्यात नसल्याचं वक्तव्य

----------------------------------------------

कोलकाता कसोटीत टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 178 धावांनी धुव्वा, पाकिस्तानला माघारी टाकून भारताची कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप