India vs New Zealand, 2nd Test : पहिल्या कसोटीमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीमध्ये दमदार सुरुवात केली. पुण्यात सुरु असलेल्या दुसऱ्यात कसोटीत पाहुण्या न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात अवघ्या 259 धावांमध्ये गुंडाळत कसोटीवर मजबूत पकड मिळवली. मात्र, टीम इंडियाच्या पहिल्या डावाची सुरूवात सुद्धा अत्यंत निराशाजनक झाली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था एक बाद एक अशी झाली. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी सावध खेळ करत उर्वरित षटके खेळून काढली. टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 16 अशी स्थिती आहे.






दरम्यान, आज (24 ऑक्टोबर) सकाळी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात लॅथम आणि काॅनवे यांनी केली. मात्र, आठव्या शतकात लॅथमला आश्विनने बाद करत टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर जम बसलेल्या विल यंगला सुद्धा बाद करत दुसरे यश मिळवून दिले. रचिन रवींद्र आणि काॅनवे यांनी संघाच्या डाव सावरण्याचा प्रयत्न केला.






काॅनवे आणि रचिन यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर वाॅशिग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लावला. 3 बाद 197 अशा सुस्थितीत न्युझीलंड दिसत असताना वाॅशिंग्टन सुंदरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 259 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडने अवघ्या 62 धावांत 7 फलंदाज गमावले. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी मोठे यश मिळालं. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 59 धावांमध्ये सात बळी टिपले, तर अश्विनने सुंदर साथ देताना 64 धावांमध्ये तीन बळी टिपले. न्यूझीलंडचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.






इतर महत्वाच्या बातम्या