India vs England 5th Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत पहिल्याच दिवशी भक्कम पकड मिळवली आहे. धर्मशाला कसोटीत पहिल्या दिवशी भारताने 1 बाद 135 अशी भक्कम मजल मारली आहे. टीम इंडिया इंग्लंडपेक्षा 83 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद परतले. रोहित शर्मा 52 धावा करून खेळत आहे. शुभमन गिल 26 धावा करून नाबाद आहे. यशस्वी जैस्वाल 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालला शोएब बशीरने बाद केले.






रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची झंझावाती सुरुवात


तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 218 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने 58 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या चेंडूवर बेन फॉक्सने यशस्वी जैस्वालला यष्टिचित केले. 






जॅक क्रॉलीचे अर्धशतक, पण इतरांची निराशा 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेले इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर सातत्याने विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. विशेषत: इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडे भारतीय फिरकीपटूंना उत्तर नव्हते. 175 धावांवर चौथी विकेट गमावलेल्या इंग्लिश संघाचे आठ फलंदाज 183 धावापर्यंत पॅव्हेलियनमध्ये गेले. जॅक क्रॉलीने 79 धावांची चांगली खेळी केली, पण बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.


भारतीय फिरकीपटूंसमोर बेन स्टोक्सचा संघ विस्कळीत 


भारताकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या चायनामन गोलंदाजाने 5 फलंदाजांना बाद केले. अश्विनने 100 व्या कसोटीत 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला 1 यश मिळाले. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 3-1 ने आघाडीवर आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या