नवी दिल्ली : दिल्लीतील खराब हवामानाचा फटका आज होणाऱ्या क्रिकेट सामन्याला बसू शकतो. भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये आज दिल्लीत टी-20 मालिकेतील पहिला सामना होणार आहे. परंतु अतिशय कमी दृश्यमानतेमुळे हा सामना रद्द होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. सामनाधिकारी रंजन मदुगले याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत.
आजचा सामना प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहे. परंतु प्रदूषण आणि कमी दृष्यमानता यामुळे खेळाडूंना दुखापत होऊ शकते. याची सामनाधिकाऱ्यांना जास्त चिंता आहे. दरम्यान, सामना खेळवळा गेला, तर सामन्यादरम्यान गरज पडल्यास मास्क वापरावा, अशा सूचना बीसीसीआयने भारतीय संघ व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
दरम्यान, माजी क्रिकेटर आणि दिल्लीतले भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी आजच्या सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परंतु अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. पाहुण्या बांगलादेश संघानेही प्रदूषणाबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही, सर्वांनाच दोन्ही संघातील खेळाडूंच्या आरोग्याची चिंता आहे.
उभय संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिवम दुबे.
बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), मुशफिकर रहिम, मुस्ताफिझूर रेहमान, तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, शफिऊल इस्लाम, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन.
दिल्लीतल्या प्रदूषणामुळे भारत-बांगलादेश टी20 सामना रद्द होण्याची शक्यता
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
03 Nov 2019 04:00 PM (IST)
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टी20 सामना प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहे. परंतु प्रदूषण आणि कमी दृष्यमानता यामुळे खेळाडूंना दुखापत होऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -