India Vs Australia World Cup Final : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनलची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. उद्या रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावेल. तसेच 20 वर्षांचा हिशेबही चुकता करायचा आहे. मात्र, पाऊस पडला तर फायनलची मजा बिघडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.
तरीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही तर? तर काय होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रविवारी अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही. हवामान खात्यानुसार रविवारी हलका सूर्यप्रकाश असेल. दिवसाचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.
पाऊस पडला तर काय होईल?
रविवारी हवामान स्वच्छ राहील. पण पाऊस पडला तर? असा प्रश्न मनात येऊ शकतो. पावसामुळे सामना पूर्णपणे वाहून गेला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. आयसीसीने फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. जेव्हा सामना 20-20 षटकांचा खेळला जाऊ शकत नाही तेव्हा राखीव दिवस लागू केला जातो. मात्र, पंच पहिल्याच दिवशी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
संयुक्तपणे विजेते केव्हा घोषित केले जाऊ शकते?
आयसीसीच्या नियमांनुसार अंतिम सामना नियोजित तारखेला होऊ शकला नाही तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्णपणे वाहून गेला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाते. 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हे दिसून आले. भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही अंतिम सामना राखीव दिवशी पोहोचलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या