Human Behaviour: क्रोध विनाशाचं कारण बनतो, त्यामुले माणसाने कधीही जास्त रागावू नये, असं तज्ज्ञ सांगतात. राग हा माणसाचं मन मारून त्याची बुद्धी हिरावून घेतो. रागाच्या (Anger) भरात लोक अनेकदा चुकीची पावलं उचलतात, चुकीचे निर्णय घेतात. रागात माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरक समजू शकत नाही आणि क्रूर पावलं उचलतो. रागाच्या प्रभावाखाली माणूस स्वतःचं अस्तित्व विसरतो, आपलेपणा, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा बाजूला ठेवतो. रागाच्या स्थितीत माणूस आणि क्रूर प्राणी यात काहीही फरक नसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.

Continues below advertisement


रागासह हे आहेत मानवी जीवनाचे शत्रू


माणसाचा राग कधी कधी त्याच्यासाठी घातक ठरतो. राग ही मानवी मनाची अशी भावना आहे, जी अनेकदा वाईट ठरते. भीती हा रागाचाही जनक मानला जातो. जेव्हा मानव भीतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती रागाच्या रूपात प्रकट होते. वासना, क्रोध, अभिमान, लोभ हे जीवनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


'इतरांवर जास्त रागवू नका'


गुरूंनी आपल्या शिष्यांना नेहमी चांगुलपणा आणि सद्गुणांचा प्रसार करण्यास शिकवलं. नुसता उपदेशात वेळ वाया घालवू नये, तर गोरगरीब, दु:खी, असहाय्य, निराधार यांची सेवा करावी, असं ते म्हणत. कोणी तुमच्याकडे येऊन प्रेमाने मदत मागितली आणि तुम्ही ती केली, नंतर तो तुमच्याशी अयोग्य वागला तरी त्याच्यावर रागावू नका. परमार्थात जे काही मिळेल, त्यात तृप्त व्हा.


'अति क्रोध हे नरकाचं द्वार'


लोक तुम्हाला विरोध करतील आणि त्रास देतील, असंही तज्ज्ञ म्हणाले. पण अतिशय काळजीपूर्वक शांतता आणि संयम राखा. ते शरीराला हानी पोहोचवू शकतात, परंतु आत्म्याला नाही. जो सत्य आणि अहिंसेवर ठाम आहे, त्याला कोणीही मारू शकत नाही. जो तुमचा तिरस्कार करतो, तो स्वतः देवाचा तिरस्कार करतो, कारण त्याच देवाने आम्हा सर्वांना निर्माण केलं आहे. भगवान श्रीकृष्णाने क्रोधाचं वर्णन नरकाचं द्वार असं केलं आहे.


'राग धरणाऱ्यांची लवकर प्रगती होत नाही'


तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, ज्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा राग येतो, तो आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही आणि आयुष्यात नेहमीच दुःखी राहतो. रागाच्या स्थितीत माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या अवस्थेत माणूस स्वतःचाही राहत नाही. तो निरर्थक गोष्टी बोलू लागतो. शास्त्रात याला माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आलं आहे. रागाच्या भरात माणूस आपला संयम गमावतो आणि काहीही करतो. राग आणि वादळ यांचं वर्णन सारखंच करण्यात आलं आहे. दोघेही शांत झाल्यावरच नुकसान किती झालं हे कळतं. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की, क्रोध हे सर्व संकटांचं मूळ कारण आहे. तो सांसारिक बंधनांना कारणीभूत आहे, धर्माचा नाश करणारा आहे, राग गोंधळ निर्माण करतो आणि तो बुद्धी बिघडवणारा आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology: पुढचा आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार शुभ; आदित्यमंगल राजयोगामुळे होणार धन लाभ, मिळणार यश