अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) अंतिम फेरीत 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (India vs Australia World Cup Final) संघ आमनेसामने येणार आहेत. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला, तर कांगारू संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. टीम इंडियाने या विश्वचषकात सहभागी झालेल्या प्रत्येक संघाचा पराभव केला आहे. प्रत्येक खेळाडूने अप्रतिम कामगिरी दाखवली आहे त्यामुळे एकाची निवड करणे खूप अवघड आहे पण माजी सलामीवीर गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) गेम चेंजर म्हणून एकाचं नाव घेतलं आहे. 






भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यजमान संघाची कामगिरी प्रभावी ठरली आहे. आतापर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. या संघाने सलग 9 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन या आक्रमक सलामीच्या जोडीनंतर विराट कोहली दहशत निर्माण करत आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि केएल राहुलची फलंदाजी जबरदस्त आहे. मोहम्मद शमी चेंडूने कहर करत आहे.






टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू असा आहे की तो स्वतः मॅच बदलू शकतो. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir on Shreyas Iyer) आपले मत व्यक्त केले आणि वर्ल्ड कप फायनलपूर्वी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये श्रेयस अय्यरला गेम चेंजर म्हणून उल्लेख केला तो म्हणाला की, एक मोठी गोष्ट मी सांगेन, विराट कोहलीनं चांगली खेळी केली आहे पण माझ्यासाठी या सामन्याचा खरा गेम चेंजर श्रेयार अय्यर आहे. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या या खेळाडूने काय अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत आणि अंतिम सामन्यातही तो खरा गेम चेंजर ठरू शकतो.


गंभीरची गेम चेंजर कामगिरी


या विश्वचषकात श्रेयस अय्यरने अप्रतिम फॉर्म दाखवला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या या फलंदाजाने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावली आहेत. नेदरलँडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचाही पराभव केला. या विश्वचषकात आतापर्यंत एकूण 526 धावा झाल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या