मुंबई : वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यातील ठळक अपयश आणि शाॅर्ट चेंडूवर होणाऱ्या कसरतीमुळे संकटात आलेल्या श्रेयस अय्यरनं जोरदार कमबॅककरत झळकावलेल्या दोन सलग दमदार शतकांमुळे टीकाकारांना तोंड बंद करावं लागलं आहे. कामगिरी बोलू लागल्यानंतर झालेल्या टीकेवरही श्रेयसनं प्रत्युत्तर दिलं आहे. 


चौथ्या क्रमांकाचे महत्त्व ओळखता श्रेयसकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. सातत्याने शाॅर्ट चेंडूवर अडखळताना दिसून आला. त्यामुळे सडकून टीका होत असताना श्रेयसवरील विश्वास कॅप्टन रोहितन कमी होऊ दिला नाही. चौथ्या क्रमांकावर संधी देत त्याला शाॅर्ट चेंडूवर खेळण्यासाठी मेहनत घेण्याचा सल्ला दिला आणि तो सल्लाही श्रेयसने शिरोधार्य मानला. त्याने आपल्या रणनीतीत केलेला बदल पुढील सामन्यांमध्ये दिसून आला. 






कोहली, शमीच्या वादळात श्रेयाला मुकला 


वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सांघिक कामगिरी झाली आहे. टाॅप फाईव्ह स्टार असलेल्या कॅप्टन रोहितसह गिल, विराट आणि राहुलने केलेली कामगिरी चर्चेचा विषय झाला. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये टीम इंडियाची त्रिमूर्ती शमी, सिराज आणि बुमराह झळकले. त्यामुळे या दिग्गजांच्या यादीत 'विराट' कामगिरी करूनही श्रेयसच्या कामगिरीची चर्चा झाली नाही. मात्र, त्याने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये दाखवलेली कामगिरी निश्चितच टीम इंडियाला दीर्घकालीन दिलासा देणारी आहे.  


श्रेयस अय्यरने विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने चालू विश्वचषकात 2 शतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीला खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरही आता अय्यरनं सडेतोड उत्तर दिले आहे. तो सामन्यानंतर म्हणाला की, ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात मला मोठी धावसंख्या करता आली नाही. मी संपर्कात असलो तरी लोक माझ्यावर प्रश्न उपस्थित करू लागले. टीम इंडिया तब्बल 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. अय्यरने सेमीफायनलच्या सामन्यात 70 चेंडूत 105 धावा केल्या. यामध्ये तब्बल 8 षटकार मारले.






माझ्यावर प्रश्न उपस्थित केले 


सामन्यानंतर हॉट स्टारशी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर विश्वचषकातील काही सामन्यांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर माझ्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. एवढेच नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या चेंडूचा सामना करताना मला त्रास होत असल्याचेही बोलले जात होते. मला आतून राग येत होता आणि मी माझ्या वेळेची वाट पाहत होतो. मी उपांत्य फेरीत शतक झळकावून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे.






मी 2011 मध्येच ठरवले होते की मी येथे खेळणार 


श्रेयस अय्यरने सांगितले की, जेव्हा टीम इंडियाने वानखेडेवर 2011 विश्वचषक फायनल जिंकली तेव्हा मी स्टेडियममध्ये होतो आणि सामना पाहत होतो. तेव्हा मला वाटले की एक दिवस मीही इथे खेळेन. दुखापतीनंतर त्याच्या पुनरागमनात प्रशिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्याने सांगितले. आशिया चषक स्पर्धेनंतर मी माझी लय परत मिळवू शकलो नाही असे वाटत असले तरी या काळात संघ व्यवस्थापनाने मला पूर्ण पाठिंबा दिला. श्रेयस अय्यरचे हे सलग दुसरे शतक आहे. याआधी त्याने नेदरलँडविरुद्ध 128 धावा करून नाबाद राहिला होता.


इतर महत्वाच्या बातम्या