भारताच्या हाताशी अजूनही 129 धावांची आघाडी असून, या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं.
चेतेश्वर पुजाराचं द्विशतक, रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत नऊ बाद 603 या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.
पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. पुजारानं 525 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. त्याचं हे कसोटी कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठरलं.
रिद्धिमान साहानं 233 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्याचं हे तिसरं कसोटी शतक होतं. रवींद्र जाडेजानं 55 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलं. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश आलं. मात्र, रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केल्यानंतर, DRS वापरल्यामुळे साहाला जीवदान मिळालं. पण यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.