IndvsAus - भारत पराभवाच्या छायेत
एबीपी माझा वेब टीम | 25 Feb 2017 02:10 PM (IST)
पुणे: पुणे कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 441 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं असून त्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ 89 धावांतच माघारी परतला आहे. भारताच्या अवघ्या 99 धावात 6 विकेट गेल्या आहेत. मुरली विजय, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन आणि रिद्धीमान साहा स्वस्तात बाद झाल्यानं टीम इंडिया संकटात सापडली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 155 धावांची आघाडी घेतली होती. मग आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं शतक साजरं केलं. त्यामुळं कांगारूंना दुसऱ्या डावात 285 धावांची मजल मारता आली. स्मिथनं 109 धावांची खेळी केली तर भारताकडून अश्विननं चार आणि जाडेजानं तीन विकेट्स काढल्या.