Sanjay Gadhvi Passed Away: 'धूम' आणि 'धूम 2' या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. 


संजय गढवी हे अंधेरी भागातील ग्रीन एकर्स या इमारतीत राहत होते. आज सकाळी संजय गढवी यांचे निधन झाले आहे. संजय गढवी हे घरी असताना बेशुद् पडले. त्यानंतर  संजय गढवी यांना तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. संजय गडबी यांचा मृतदेह रुग्णालयात आहे.


धूम चित्रपटामुळे मिळाली लोकप्रियता


संजय यांनी 2000 मध्ये 'तेरे लिए' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.  या चित्रपटाचे आधी नाव 'तू ही बात' असे होते, ज्यामध्ये अर्जुन रामपाल आणि रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, कमी बजेटमुळे हा चित्रपट रखडला होता. संजयला 2004 मध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यांनी धूम या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. धूम चित्रपटात अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, जॉन अब्राहम, ईशा देओल आणि रिमी सेन सारखे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचा दुसरा पार्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संजय गढवी यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट


संजय गढवी यांनी धूम 2, 'मेरे यार की शादी है' आणि इम्रान खान स्टारर 'किडनॅप' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय 2012 मध्ये त्यांनी 'अजब गजब लव' हा चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केला होता. 'ऑपरेशन परिंदे' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.






चित्रपटसृष्टीवर शोककळा


फिल्म डायरेक्टर कुणाल कोहली, फिल्म मेकर संजय गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संजय गढवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "खूप लवकर गेले मित्रा.तुझी आनंदी उर्जा  नेहमी लक्षात राहिल.रेस्ट इन पिस."असं ट्वीट संजय गुप्ता यांनी केलं आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Chandra Mohan: ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास