India vs Australia 2023 World Cup Final : भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची खात्री आता जर तरच्या खेळात अडकली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची अंदाजे धावसंख्या 315 आहे. भारतीय संघ 315 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला तर भारताचा विश्वविजेता होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. खरं तर, शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीच्या क्युरेटरने पहिल्या डावातील धावसंख्या 315 असेल तर त्याचा सहज बचाव केला जाईल, असे सांगितले होते. म्हणजेच भारतीय संघ 315 धावांच्या आसपास पोहोचला तर ऑस्ट्रेलियासाठी ते सोपे जाणार नाही.


मात्र, टीम इंडियाची फलंदाजी कोसळली 


पाॅवर प्लेमधील 10 षटकातील 80 धावा वगळल्यास पूर्णत: ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे टीम इंडियावर नियंत्रण राहिले. रोहित आणि त्यानंतर श्रेयस बाद झाल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर गेली ती सावरलीच नाही. विराट कोहली आणि राहुलने दमदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाने 46 षटकात 8 गडी गमावत 220 धावा केल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या आशा सूर्यावर असून ते किती धावा जोडतात, यावर गणित अवलंबून असणार आहे.  


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का 30 धावांवर बसला. शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला. शुभमन गिलला मिचेल स्टार्कने आपला शिकार बनवले. मात्र, यानंतर रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र पुन्हा एकदा भारतीय कर्णधाराला पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रोहित शर्माला ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.


इतर महत्वाच्या बातम्या