Tiger 3 Box Office Collection : 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या आठ दिवसांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'टायगर 3' या सिनेमाचा जगभरात बोलबाला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरात 400 कोटींचा टप्पा पार करणार आहे.
'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tiger 3 Box Office Collection)
'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, सातव्या दिवशी 18.5 कोटी आणि आठव्या दिवशी आतापर्यंत 4.3 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या आठ दिवसांत भारतात आतापर्यंत या सिनेमाने 223.43 कोटींची कमाई केली आहे.
पहिला दिवस : 44.5 कोटी
दुसरा दिवस : 59.25 कोटी
तिसरा दिवस : 44.3 कोटी
चौथा दिवस : 21.1 कोटी
पाचवा दिवस : 18.5 कोटी
सहावा दिवस : 13.25 कोटी
सातवा दिवस : 18.5 कोटी
एकूण कमाई : 223.43 कोटी
'टायगर 3'चा जगभरात बोलबाला
'टायगर 3' या सिनेमात जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. सलमानचे जगभरातील चाहते हा सिनेमा आवडीने पाहत आहेत. 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत 348 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 400 कोटींचा टप्पा पार करेल.
'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने सांभाळली आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. टायगर 3 या सिनेमासह बॉक्स ऑफिसवर 12 वी फेल हा सिनेमादेखील दणदणीत कमाई करत आहे. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
सलमानच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर सिनेमा
'टायगर 3' हा सलमानच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. थिएटरमध्ये पुन्हा-पुन्हा जात प्रेक्षक या सिनेमाचा आनंद घेत आहेत. या सिनेमात शाहरुख खानचीदेखील (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळत आहे. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहेत. एकंदरीतच 'टायगर 3'च्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.
शराज स्पाय यूनिवर्सच्या टायगर फ्रेंचायजीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांतच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेप्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.
संबंधित बातम्या