माऊंट मोंग्नुई (न्यूझिलंड) : पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल धावांनी धुव्वा उडवत अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या मोहिमेला दिमाखात सुरुवात केली. टीम इंडियानं दिलेल्या 329 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 228 धावात खुर्दा उडाला.
न्यूझीलंडच्या बे ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. भारताकडून शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीनं भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर आभिषेक शर्मा आणि अनूकूल रॉयनं एकेक विकेट घेतली.
दरम्यान, पृथ्वी शॉ, मनोज कालरा आणि शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं 50 षटकात सात बाद 328 धावांचा डोंगर उभारला होता.
पृथ्वी शॉनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना सलामीला येऊन 8 चौकार आणि 2 षटकारांसह 94 धावांची खेळी साकारली. त्यानं मनोज कालराच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचली. मनोजनं 86 धावांचं योगदानं दिलं. तर त्यानंतर आलेल्या शुभमन गिलनं जलद 63 धावा फटकावल्या.
अंडर-19 विश्वचषक : टीम इंडियाची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2018 02:07 PM (IST)
पृथ्वी शॉ, मनोज कालरा आणि शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं 50 षटकात सात बाद 328 धावांचा डोंगर उभारला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -