क्षेपणास्त्र डागल्याची केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांना मोबाईलवर त्यासंदर्भात मेसेज आला होता, त्यांच्या जीवात जीव आला.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी सर्व लोकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन मेसेज आला. त्यात म्हटले होते, “अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात बॅलिस्टिक मिसाईलची भीती आहे. तातडीने योग्य ठिकाणी आश्रय घ्या. ही कोणतीही ड्रील नाही.”
अशाप्रकारचा मेसेज मिळाल्यानंतर लोकांमध्येही भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पुढील 10 मिनिटांनंतर हवाई आपत्कालीन यंत्रणेने ट्वीट करुन सांगितले की, “हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रांचा कोणताही धोका नाही.”
अमेरिकन लष्कराच्या हवाई विभागाने वेगळी सूचना जारी करत, क्षेपणास्त्रांसदर्भातील अलर्ट मेसेज चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकांच्या जीवात जीव आला.